चेहऱ्यावर द्राक्षे लावल्यास काय फायदा होतो, जाणून घ्या अजून कोणती फळे चेहऱ्यावर लावू शकतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक ऋतूबदल होताना आपल्या आहारातही बदल करणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यात बाजारात मुबलक फळे येतात. ही फळे मुख्यतः पाणीदार, रसदार असतात. त्यामुळेच ही फळे खाण्यासोबत चेहऱ्यावर लावल्यास त्याचे उत्तम परीणाम पाहायला मिळतात. यासाठी अनेकदा पपई, संत्रीचा वापर केलेला आपण पाहिला, ऐकला असेल. मात्र अन्य काही फळेही त्यासाठी उपयोगी ठरतात.

फळांमधून मिळणारे पोषक मूल्य नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला हानी सुद्धा पोहोचणार नाही. त्वचेसाठी फळांमधून खूप सारे चांगले घटक मिळतील. त्यामुळे आपण कोणती फळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले हे बघुया.

झेंडूचे फूल आहे सौंदर्यासाठी वरदान, आता घरीच मिळेल पार्लरसारखी चमक

द्राक्षे

द्राक्षात व्हिटॅमिन सी आणि नैसर्गिक ॲसिड्समुळे काळे डाग, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा उजळते. द्राक्षांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्याने, त्वचेची जळजळ कमी होते. तसेच द्राक्षाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने, त्वचेचे टॅनिंगही कमी होते. द्राक्षाचा वापर त्वचेसाठी फारच गुणकारी आहे. द्राक्षामुळे त्वचेला एक आगळीच चकाकी लाभते. मुख्य म्हणजे द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी अधिक मात्रेत असल्यामुळे द्राक्षे आपल्या त्वचेसाठी केव्हाही बेस्ट. व्हिटॅमिन सी हे निरोगी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात.

कलिंगड

उन्हाळ्यात कोरड्या त्वचेला आराम मिळण्यासाठी कलिंगडाचा गर चेहऱ्यावर लावणे हा उत्कृष्ट पर्याय आहे. खासकरुन गर्मीच्या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी कलिंगडाची फोड चेहऱ्यावर लावणे फार परीणामकार आहे.

कोणते शाकाहारी पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला मुबलक प्रथिने मिळतील, जाणून घ्या

टोमॅटोची पेस्ट

टोमॅटो  म्हणजे केवळ फळ न मानता आपण फळ भाजी म्हणतो. त्यामुळे टोमॅटो आपल्या किचनमध्ये कायम असतोच. हे उत्तम आरोग्यदायी फळ आहे. त्वचेला अँटीऑक्सिडेंट बूस्ट आणण्यास टोमॅटोमुळे मदत होते. साधा कच्चा टोमॅटो रोज त्वचेवर लावल्यास सुद्धा आपल्याला खूप आराम मिळतो.

चेरी

नितळ त्वचेसाठी चेरीचा उपयोग पाश्चात्य देशात खूप केला जातो. आपल्याकडे आता चेरी हे फळ मिळू लागले आहे. त्यामुळे चेरी खाऊनही आपल्याला अनेक पोषकद्रव्ये मिळतीलच. चेरी त्वचेवर लावल्याने चमकदार नितळ कांती प्राप्त होईल. चेरी देखील अँटिऑक्सिडेंटचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे.

पांढरा की लाल? कोणता कांदा आपण खायला हवा