असं झालं तर… एलपीजी ई-केवायसी केली नाही तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

  1. 16 ऑगस्टपूर्वी एलपीजी ई-केवायसी पूर्ण न केल्यास गॅस रिफिल बुकिंग आणि सबसिडी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. पण आता घरबसल्या ई-केवायसी करणे शक्य झाले आहे.

  2. प्रत्येक गॅस कनेक्शनची पडताळणी करणे तसेच बनावट किंवा अनधिकृत कनेक्शन रोखणे आणि सरकारी अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे.

  3. ग्राहक जवळच्या गॅस एजन्सीला भेट देऊन किंवा गॅस कंपनीच्या अधिकृत ऑनलाइन सुविधेद्वारे ई-केवायसी करू शकतात. यासाठी आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी केली जाते.

  4. आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक यासह आवश्यक ओळखपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्राहकाच्या गॅस कनेक्शनची माहिती अद्ययावत केली जाते.

  5. अनेक भागांमधील ग्राहकांनी ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे गॅस एजन्सीकडून फोन कॉल, एसएमएस तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून ग्राहकांना प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले जात आहे.