असं झालं तर…  – आधार कार्ड हरवले तर…

आधार कार्ड हरवले तर तुमची तारांबळ उडू शकते. अचानक आधारकार्डची गरज भासल्यास ई-आधार मोबाइल किंवा संगणकावरून डाऊनलोड करू शकता.

UIDAI च्या वेबसाईटवरून तुम्हाला आधार कार्ड पुन्हा मिळविता येईल. ज्यांचा मोबाइल क्रमांक किंवा ई-मेल आयडी आधारशी लिंक आहे, ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

UIDAI च्या वेबसाईटवर ‘Retrieve Lost or Forgotten UID/EID’ या लिंकवर क्लिक करून तुम्हाला आधारबाबत माहिती मिळविता येईल.

तुम्हाला OTP प्राप्त होईल. तो भरून सबमिट केल्यावर तुम्हाला आधारची माहिती दिसेल. तेथे तुम्ही ई-आधारकार्ड डाऊनलोड करू शकता. यासाठी कोणतेची शुल्क द्यावे लागणार नाही.

मोबाइल क्रमांक आधारशी लिंक नसल्यास आधार नामांकन पेंद्रावर जावे लागेल. तेथे बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतर मोबाइल क्रमांक आधारशी लिंक होईल.