तुमच्या मुलांना तुम्ही बॉर्नविटा देताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे… वाचा काय आहे प्रकरण

BOURN VITA हे नाव लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे आहे. आपल्या मुलाची योग्य वाढ व्हावी म्हणून त्याला बॉर्न विटा द्या अशा आशयाच्या  जाहीराती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे झळकत आहेत. त्यामुळे अनेक घरात हे मुलांसाठी एक पौष्टीक ड्रिंक म्हणून आणले जाते. मात्र ज्या बॉर्नविटाला आपण सर्व पौष्टीक मानत होतो ते प्रत्यक्षात मात्र आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टीक नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थेट केंद्र सरकारनेच याबाबत कडक पाऊले उचलत बॉर्न विटाला हेल्थ ड्रिंकच्या प्रकारातून (कॅटेगरी) हटवण्याचे आदेश दिले आहेत.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सगळ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील काही उत्पादनांना हेल्थ ड्रिंक्स पेये आणि शीतपेये या श्रेणीतून काढून टाकण्यास सांगितले आहे. यामध्ये बोर्नविटा आणि काही इतर उत्पादनांचा समावेश आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPR) ने काढलेल्या निष्कर्षानुसार, FSS Act 2006, FSSAI आणि Mondelez India द्वारे तयार केलेल्या नियमांनुसार कोणतेही पौष्टीक पेय म्हणून त्याचा उल्लेख केलेला नाही.