चांदीची भांडी, दागिने काळे पडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चांदीचे दागिने आणि भांडी असतात. सणासुदीला चांदीची भांडी आपण हमखास वापरात आणतो. परंतु चांदीचा संपर्क वातावरणातील हवेशी झाल्यावर चांदी काळी पडू लागते. अशावेळी चांदीच्या दागिन्यांची तसेच भांड्यांची खूप काळजी घ्यावी लागते.

आहारामध्ये शेवगा समाविष्ट करताना कोणकोणते पदार्थ बनवता येतील

चांदी हा एक धातू आहे. जो हवेतील सल्फर किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर काळा पडतो. ऑक्सिडेशनमुळे चांदीच्या दागिन्यांवर आणि भांड्यांवर काळे डाग पडतात. जास्त प्रदूषण असलेल्या भागात, चांदीच्या वस्तू लवकर काळी पडतात.

हवेत असलेल्या सल्फरमुळे चांदीचे दागिने किंवा भांडी काळी होऊ शकतात, म्हणून त्यांना हवेच्या संपर्कातून कसे वाचवायचे हे महत्वाचे आहे. तुमच्या चांदीच्या दागिन्यांना हवेच्या संपर्कापासून वाचवण्यासाठी, ते झिपलॉक बॅग किंवा हवाबंद कंटेनर आणि बॉक्समध्ये ठेवावेत.

दुपारच्या जेवणात ताक पिण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल

चांदीचे दागिने ठेवताना मखमली किंवा फ्लानेल सारखे अँटी-टर्निश कापडाचा वापर करावा. चांदीच्या वस्तू गुंडाळण्यासाठी फॅब्रिकचा अ‍ॅसिड-फ्री टिश्यू पेपर देखील एक चांगला पर्याय आहे. प्रत्येक चांदीची वस्तू स्वतंत्रपणे गुंडाळली पाहिजे.

तुम्ही तुमच्या चांदीच्या वस्तू ठेवताना दागिने थेट सूर्यप्रकाशापासून देखील दूर असले पाहिजेत, म्हणजे तुम्ही ते गडद ठिकाणी ठेवावेत.

चांदी ठेवताना इतर धातूंपासून वेगळे ठेवावेत. विशेषतः तांबे आणि लोखंडाच्या संपर्कामुळे रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते आणि चांदी काळी पडू शकते.

डिटॉक्स म्हणजे नेमके काय? याकरता कोणत्या आयुर्वेदिक पद्धतींचा अवलंब करायला हवा