
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा. गाद्या, पलंग, सोफे, फर्निचर व्हॅक्युम करा. लाकडी फर्निचरला कीटकनाशक लावा. जर ढेकणांची संख्या जास्त असेल तर पेस्ट पंट्रोल करा.
ढेकणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कडूलिंबाचा पाला घरात ठेवा. लवंग आणि पुदिना यांच्या वासाने ढेपूण घरातून जाऊ शकतात. कडुलिंबाचे तेल फर्निचरवर लावू शकता. ढेकणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत उपयुक्त ठरते. झोपण्यापूर्वी पुदिन्याची पाने अंथरुण शेजारी ठेवा.