किचन स्वच्छ ठेवायचे असेल तर… हे करून पहा

किचन स्वच्छ असेल तर घर स्वच्छ आहे, असे समजले जाते. किचनमधील कपाटे आणि भिंती स्वच्छ ठेवा. यासाठी एका स्प्रे बाटलीत व्हिनेगर आणि कोमट पाणी समान प्रमाणात एकत्र करा. चिकट भागावर मिश्रण फवारा आणि 5 मिनिटांनंतर स्वच्छ ओलसर कापडाने हलक्या हाताने पुसून टाका.

घाण झालेल्या गॅस बर्नरवर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा लावल्यास ते स्वच्छ होतात. तेलकट आणि चिकट टाईल्स साफ करण्यासाठीही व्हिनेगर आणि कोमट पाणी हे प्रभावी आहे. स्वयंपाकघरातील अनावश्यक सामान काढून टाका, स्वच्छतेसाठी डिटर्जंटचा वापर केल्यानंतर तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा आणि स्वच्छ कापडाने पुसायला विसरू नका.