
खळखळून हसणे हे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र अनेकांना चारचौघात तसे हसता येत नाही. दातांचा पिवळेपणा त्यावर बंधने आणतो. हा पिवळेपणा घालवायचा असेल तर घरातच काही उपाय करता येतील.
नियमित ब्रश करण्याची सवय नसेल तर दातांचा शुभ्रपणा कमी होत जातो. त्यामुळे नियमित ब्रश करणे हा सर्वात सोपा आणि पहिला उपाय आहे.
खोबरेल तेलाने गुळण्या केल्याने दातांचा पिवळसरपणा कमी होतो. हा प्रयोग 10 ते 15 मिनिटे करावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चूळ भरावी.
मोहरीचे तेल आणि मिठाच्या मिश्रणानेही दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. त्यासाठी एक चमचा मोहरीच्या तेलात चिमूटभर सैंधव मीठ टाकून दातांवर बोटाने घासावे.
या उपायांनी फरक वाटत नसल्यास डॉक्टरांकडून दात स्वच्छ करून घेणे कधीही चांगले.