भाविकांनी अर्पण केलेल्या नारळांचे करायचे काय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सोनई

शनि-शिंगणापूर येथे भाविकांनी अर्पण केलेल्या २ लाखांहून अधिक नारळांचे करायचे काय? असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. विश्वस्तांवर शासनाचे निर्बंध आलेले असतानाच या नारळांच्या टेंडरच्या हालचाली सुरू होत्या. विरोधामुळे संस्थानने ते टेंडर काढले नाही. त्यानंतर या नारळांच्या ढिगात भरच पडत आहे. दरम्यान, विश्वस्त डॉ. वैभव शेटे यांनी पुण्यात सहधर्मादाय आयुक्तांची भेट घेतली असता नारळाचे टेंडर न काढता ते प्रसाद म्हणून वाटण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यामुळे आता या नारळाच्या ढिगाचे वाटप कसे करायचे? असा पेच निर्माण झाला आहे.

शनि-शिंगणापूर देवस्थान राज्य शासनाने ९ जून २०१८ रोजी ताब्यात घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर सत्तर गाळ्यांचे लिलाव नियमित झाले. मात्र, देवस्थानने भाविकांना अर्पण केलेले नारळाचे टेंडर काढण्याचे टाळले. त्यानंतर विनापरवाना टेंडर काढण्याच्या हालचाली डॉ. वैभव शेटे यांनी हाणून पाडल्या. त्यामुळे टेंडर होऊ शकले नाही. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे शनिदेवाला अर्पण करण्यात येत असलेल्या नारळाची संख्या मोठी असल्याने गेल्या १३ महिन्यांपासून महाद्वाराजवळ नारळ प्रसादाचा मोठ्या प्रमाणात ढीग साचल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच काल बुधवारी (दि. ३) विश्वस्त डॉ. वैभव शेटे यांनी सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांची भेट घेतली असता, त्यांनी देवस्थानचा वाढता गैरव्यवहार लक्षात घेता, जमा झालेला नारळ प्रसाद म्हणून भाविकांना मोफत वाटप करावा, अशा सूचना दिल्या. शिवाय शासनाने ताब्यात घेतलेल्या चार महिन्यांच्या काळातील अनेक गैरव्यवहारांची सखोल चौकशी केली जाणार आहे. नोकरभरती व बँकांमधील पावत्या मोडून विल्हेवाट लावल्याप्रकरणी लक्ष वेधले असता, चौकशीत दोषी आढळल्यास विश्वस्त व अधिकाNयांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त दिलीप देशमुख यांनी दिल्याचे डॉ. वैभव शेटे यांनी सांगितले.

दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो. मात्र, शासनाने विश्वस्तांवर निर्बंध घातले आहेत. तरीही सहधर्मादाय आयुक्तांची रीतसर परवानगी मागून कर्मचाNयांना दिवाळी बोनस मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी प्रयत्न करू.
विश्वस्त डॉ. वैभव शेटे

दिवाळी बोनसवर टांगती तलवार
शनि- शिंगणापूर देवस्थानवर शासनाने नियंत्रण मिळविले आहे. मात्र, अद्यापही प्रांत दर्जाचा अधिकारी व शासन नियुक्त विश्वस्त मंडळ नेमले गेले नाही. त्यामुळे शनि-िंशगणापूर देवस्थानच्या ४०० कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसवर यंदा टांगती तलवार आहे. कारण शासनाने देवस्थान ताब्यात घेतल्याने विश्वस्तांवर निर्बंध घातले आहेत. दिवळी बोनसला जवळपास ८० लाख ते १ कोटी रुपये रक्कम वाटप करावी लागते. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेचा निर्णय घेणे प्रशासनाच्या हाती नसल्याने सहधर्मादाय आयुक्त परवानगी देणार का? हा प्रश्न आहे.