धनत्रयोदशीला काय खरेदी कराल?

दिवाळीच्या दिवसात धनत्रयोदशीला विशेष महत्व असते. या दिवशी अनेकजण आवर्जून सोन्या चांदीच्या वस्तूंबरोबर इलेक्ट्रीक वस्तूंचीही खरेदी करतात. या दिवशी खरेदी केल्यास भरभराट होते असं मानलं जातं . पण बऱ्याचवेळा खरेदीच्या या नादात काही अशाही वस्तूंची खरेदी केली जाते ज्यांचा धनत्रयोदशीशी काहीही संबंध नसतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हांला या दिवशी नेमकं काय खरेदी करायला हवे ते सांगणार आहोत.

असे मानले जाते कि , धनत्रयोदशीच्या दिवशी समुद्र मंथन होत असताना भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकटले होते. यामुळे या दिवशी पितळेची भांडी किंवा वस्तूंची खरेदी करणे शुभ असते. पितळ या धातूला धन्वंतरीचा धातू मानले जाते. याची खरेदी केल्यास घरात सुदृढ आरोग्य, सौभाग्य, आणि संपन्नता नांदते.

या दिवशी चांदी खरेदी केल्याने भाग्य उजळतं असं मानलं जातं. घरात धन, धान्य, आणि समृध्दी वाढते. लश्र्मीची अखंड कृपा राहते. या दिवशी चांदी किंवा इतर धातूची गणपती आणि लक्ष्मीची मूर्ति आवर्जून घ्यावी. यामुळे घरावरच आर्थिक संकट दूर होतं. असे मानले जाते.

धनत्रयोदशीला भगवान कुबेराची पूजा करावी. या दिवशी कुबेराचा फोटो विकत घ्यावा. घराच्या उत्तर दिशेला तो स्थानापन्न करावा. त्याची मनोभावे पूजा करावी. उद्योगधंद्यात भरभराट होते. कसलीही तदात राहत नाही.
या दिवशी शंख करेदी करणेही शुभ असते. हा शंख देवघरात ठेवावा. तो रोज वाजवावा. ज्या घरात रोज शंखनिनाद केला जातो त्या घरावर कधीही संकट येत नाही. असे म्हटले जाते.

लक्ष्मी मातेला कवड्या फार आवडतात. म्हणून लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी काही जण या दिवशी कवड्या विकत घेतात. देवघरात इतर देवांबरोबर त्यांचीही पूजा करतात. त्यानंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास पैशांची कधीही कमी पडत नाही.

या दिवशी अख्खे धणे नक्कीच विकत घ्या. ते बागेत किंवा घरातील कुंडीत पेरा. रोज त्याला पाणी घाला. त्यांची देखभाल करा. जितके तृण उगवतील तितकी त्या घरावर परमेश्वराची कृपा राहील. या दिवशी झाडू खरेदी करणेही शुभ मानले जाते. घरातील नैराश्य व नकारात्मक उर्जा नष्ट होते.