व्हॉटस्ऍप आता एकाचवेळी अनेक ठिकाणी वापरता येणार!

699

एका हॅण्डसेटवरून दुसऱ्या हॅण्डसेटवर व्हॉटस्ऍप ऍपवर नेले की पहिल्या मोबाईलवर ते वापरता येत नाही. कुठल्याही एकाच मोबाईलवर तो अकाऊंट आपण वापरू शकतो. मात्र फेसबुकने आपल्या मालकीच्या व्हॉटस्ऍप या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपवर आता नवे फिचर आणले आहे. त्यायोगे आपण एकावेळी अनेक हॅण्डसेटवर व्हॉटस्ऍपचा एकच अकाऊंट वापरू शकणार आहोत. त्यासाठी कंपनीने ‘रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन’ नावाचे फिचर सुरू केले आहे. जी मेल जसा आपण एकाच वेळी अनेक ठिकाणी वापरू शकतो तसेच हे रजिस्ट्रेशन नोटिफिकेशन फिचर असणार आहे. आपण एखाद्या वेगळ्या हॅण्डसेटवर जी मेल उघडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला जसे ऍलर्ट नोटिफिकेशन येते तसेच ऍलर्ट या फिचरमुळे व्हॉटस्ऍपद्वारेही येऊ शकणार आहेत. हे नवे फिचर आल्यामुळे युजर्सना फायदा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या