व्हॉटस्अॅपच्या डार्क मोड फीचरसाठी वाट बघा

19

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हॉटस्अॅपचे युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून डार्क मोड फीचरची वाट बघत होते. मात्र या डार्क मोड फीचरसाठी आणखी वाट बघावी लागणार आहे. रात्रीच्या केळी काळोखात चॅटिंग केल्यास डोळय़ांकर वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून व्हॉटस्अॅपने डार्क मोड फीचर आणण्याची घोषणा केली होती. हे फीचर सुरू केल्यावर व्हॉटस्अॅपच्या बॅकग्राऊंडला काळा रंग होणार. त्यामुळे डोळय़ांना कोणतीही हानी न पोचवता अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात. व्हॉटस्अॅप अनेक दिवसांपासून डार्क मोड या खास फीचरकर काम करत होते. बीटा टेस्टिंगनंतर लवकरच याचे स्टेबल व्हर्जन लाँच केले जाईल. 2019 सालापर्यंत ते मोबाईलमध्ये उपलब्ध होईल, असे याआधी सांगण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या