ग्रुपमध्ये सामील करण्यासाठी लागणार युजरची परवानगी, व्हॉटस्ऍपचे नवे फीचर

580

 दररोज कुणीतरी आपल्याला नवीन व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये सामील करून घेतो. त्यामुळे ग्रुप्सची संख्या खूपच वाढते. आपली इच्छा नसली तरीही लोक युजरला आपापल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतात. आता हे टाळता येणार आहे. मात्र आता युजरने परवानगी दिली तरच कुणीही नव्या ग्रुपमध्ये समाविष्ट करू शकेल. व्हॉट्सऍपमध्ये हे नवे फीचर आता येणार आहे.

व्हॉट्सऍप या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपने काहीच महिन्यांपूर्वी हे फीचर दिले होते. पण आता त्यात वाढ आणि काही बदल करून ते नव्याने देण्यात येणार आहे. ग्रुप प्रायव्हसी सेटिंगमध्ये असलेले हे फीचर ऍण्ड्रॉइड आणि आयओएस युजर्सना दिले गेले आहे. व्हॉट्सऍप अपडेट कराल तर या नव्या फीचरबाबत सांगितले जाणार आहे. त्यामुळे ज्यांना या फीचरबाबत माहीत नसेल त्यांनाही ते माहीत होईल. विशेष म्हणजे या फीचरमुळे कॉन्टॅक्टमधील कोण तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकेल हेही आपल्याला ठरविता येणार आहे.

असे आहेत पर्याय…

ग्रुप प्रायव्हसीमध्ये याआधी ‘एव्हरीवन’, ‘माय कॉन्टॅक्ट्स’ आणि ‘नोबडी’ असे तीन पर्याय देण्यात आले होते. यातील नोबडी हा पर्याय निवडला तर कुणी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू इच्छित असेल तर तो तुमच्याकडे इन्विटेशन रिक्वेस्ट पाठवू शकतो. ती स्वीकारली तरच तो तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू शकतो. मात्र आता व्हॉट्सअप अपडेट केल्यानंतर ग्रुप प्रायव्हसीमधील ‘नोबडी’ हा पर्यायच काढून टाकण्यात आला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या