व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर लॉन्च, आता ग्रुपमध्ये करा प्रायव्हेट चॅटिंग

40

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

व्हॉट्सअॅप (WhatsApp) नेहमीच आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. आताही अॅड्रॉईड युझर्ससाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नवीन फिचर आणले आहे. या अपडेटेड फिचरद्वारे युझरला ग्रुप चॅटदरम्यान प्रायव्हेट रिप्लाय (Private Reply) चा पर्याय मिळणार आहे. याद्वारे ग्रुपवर चॅटिंग सुरू असताना एखाद्या खास व्यक्तीला मेसेज, व्हाईस कॉल, व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपमध्ये चार भन्नाट फिचर्सचा समावेश, वाचा काय आहे विशेष…

यापूर्वी ग्रुप चॅट सुरू असताना एखाद्या व्यक्तीला मेसेज किंवा कॉल करायचा असेल तर ग्रुपमधून बाहेर येऊन व्यक्तीचा नंबर शोधावा लागत होता. परंतु आता ग्रुप चॅट सुरू असतानाच नवीन फिचरद्वारे हव्या त्या व्यक्तीला मेसेज पाठवता येणार आहे. याचा फायदा हा आहे की ग्रुपमधील व्यक्तीला याचा पत्ताही लागणार नाही की तुम्ही प्रायव्हेट चॅट करत आहात.

असा करा प्रायव्हेट मेसेज
प्रायव्हेट मेसेज करण्यासाठी आधी युझरला त्या व्यक्तीने ग्रुपवर पाठवलेल्या मेसेजला क्लिक सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर ग्रुप चॅटच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटला टॅप करायचे आहे. टॅप नंतर युझरसमोर कॉपी, मेसेज, व्हाईस कॉल आणि व्हिडीओ कॉल चार पर्यात दिसतील. यातील हवा तो पर्याय निवडून युझर ग्रुपमधून प्रायव्हेट चॅट करू शकतो.

whatsapp-feature

आपली प्रतिक्रिया द्या