एकाच वेळी अडीचशे जणांना पाठवा मेसेज, वापरा ही सोपी ट्रिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सऍपवर मेसेज किंवा फोटो-व्हिडीओ पाठवायचे असेल तर एकाच वेळी फक्त पाचच जणांना पाठवू शकतो. जर तुम्हाला त्याच गोष्टी पुन्हा इतरांना पाठवायच्या असतील तर पुनः पुन्हा कॉण्टॅक्ट्स निवडावे लागतात. मात्र आता व्हॉट्सऍपमधून एकाच वेळी 250 जणांना मेसेज पाठवता येणार आहे. त्यासाठी फक्त ही सोपी ट्रिक वापरावी लागणार आहे.

सर्वप्रथम व्हॉट्सऍप ओपन करा. उजव्या बाजूला तीन डॉट्स दिसतील. त्या तीन डॉट्सच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर विविध पर्याय दिसतील, त्यापैकी न्यू ब्रॉडकास्टच्या पर्यायावर क्लिक करा.  ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील. आता ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचे आहे, त्याच्या नावावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही 250 लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असे केल्यानंतर 250 जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडीओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल.