
केसांना तेल लावताना काही चुका करणे टाळायला हवे. बऱ्याच वेळा बाहेरची धूळ केसांना, स्काल्पला चिकटून राहते. अशावेळी केसांना तेल लावणे टाळले पाहिजे. काही वेळेला मसाज करतो, तेही आपण थांबवले पाहिजे.
केसात कोंडा असेल तर तेल लावू नका. कारण स्काल्पवर कोंडा चिकटून राहू शकतो. केस तेलकट असतील तर केसांच्या मुळाशी तेल न लावता फक्त खालच्या बाजूस तेल लावा. 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. केसांवर शाम्पू राहणार नाही याची काळजी घ्या.



























































