
केसगळती ही समस्या प्रामुख्याने सर्व वयोगटाला सध्याच्या घडीला भेडसावत आहे. केसगळतीमुळे आपल्या आत्मविश्वासावरही खूप परीणाम होतो. मुख्य म्हणजे सध्या खाण्यापिण्याच्या सवयी तसेच प्रदूषणामुळे केसगळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. प्रदूषणामुळे केसगळती ही फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच केसांवर विविध रासायनिक शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर केल्यानेही केसगळती ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागली आहे. सध्या फॅशनच्या नावाने हेअर स्ट्रेटनिंग देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहे. या सर्व बाबी केसगळतीसाठी कारणीभूत ठरत आहेत.
केसगळती रोखण्यासाठी आहारामध्ये काही ठराविक पदार्थ समाविष्ट केल्याने, केस गळण्याचे प्रमाण कमी होते.
अंडी ही केसांसाठी खूप फायदेशीर मानली जातात. त्यात प्रथिने, बायोटिन आणि आवश्यक जीवनसत्त्वे असतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. अंडी खराब झालेल्या केसांची दुरुस्ती करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अंड्यांमधील प्रथिने केसांची रचना मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरतात. यामुळेच केस तुटणे कमी होते तसेच, अंड्यामधील बायोटिन केसांना पोषण देते, यामुळे केस मऊ मुलायम आणि मजबूत बनतात.
पालक ही भाजी व्हिटॅमिन ए, सी आणि फोलेटने समृद्ध असते. यामुळे डोक्यावरील टाळू आणि केसांना पोषक तत्वे मिळतात. पालक टाळूमधील रक्त परिसंचरण सुधारते आणि कोलेजन उत्पादन वाढवते. पालकातील लोह अशक्तपणामुळे केस गळणे कमी करण्यास मदत करते. ते केस तुटणे देखील प्रतिबंधित करते आणि मजबूत करते.
केस गळती रोखण्यासाठी रताळे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते. यामुळे टाळू निरोगी राहण्यास मदत होते. तसेच रताळ्यामुळे केसांची मुळे मजबूत होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर टाळूवरील कोरडेपणा देखील कमी होण्यास मदत होते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते. यामुळे केस मजबूत आणि जाड होतात.
पोटावरील चरबी कमी होण्यासाठी ‘ही’ घरगुती पेयं प्यायलाच हवीत, वाचा
दही केसांसाठी नैसर्गिक पोषणकर्ता म्हणून काम करते. त्यातील प्रथिने केसांची मुळे मजबूत करते आणि त्यातील लॅक्टिक अॅसिड टाळू निरोगी ठेवते. दही कोंडा नियंत्रित करण्यास आणि केसांना मॉइश्चरायझ करण्यास मदत करते, ज्यामुळे तुटणे कमी होते. दररोज दही खाल्ल्याने केस मजबूत आणि चमकतात.
आवळा केसांच्या वाढीसाठी आणि मजबूतीसाठी देखील खूप प्रभावी मानला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असतात. यामुळे केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतात. आवळा टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतो आणि केस तुटण्यापासून रोखतो. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म टाळूला शांत करतात आणि संसर्गामुळे होणारे केस गळणे कमी करतात.
































































