रत्नागिरी-सिंधुदुर्गात कोण? महायुतीत संभ्रमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन दहा दिवस उलटले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची जागा भाजप लढणार की मिंधेगट लढणार याबाबत अद्याप निश्चिती न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आटान रे आटान…लोकसभेचे तिकीट कोणाक भेटान रे होरयो… अशा राजकीय फाका आता रंगू लागल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून  नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांची नावे चर्चेत असताना विनोद तावडे यांचे नाव आता पुढे आले आहे. दुसरीकडे मिंधेगटाकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे.