
सामना ऑनलाईन । मुंबई
गुरुवार २८ जून मारिया नेहमीप्रमाणे हसतमुख चेहऱ्याने कामावर गेली. हवामान खराब असल्यामुळे आज विमान उड्डाण होणार नाही असा तिला विश्वास होता. तसे तिने मला फोनवर सांगितलेसुद्धा होते. ती नेहमीप्रमाणे घरी येईल याची खात्री होती, मात्र ती गेली परत कधीही न येण्यासाठीच. खराब हवामान असताना विमानाच्या फिटनेसची खात्री नसताना त्याचे उड्डाण करण्याचा निर्णय घेण्यात आला याला जबाबदार कोण? विमान कंपनी की उड्डाणाला परवानगी देणारी यंत्रणा? आमच्या मार्याला कुणी मारले? ‘हू किल्ड मारिया’ असा आर्त सवाल तिचे पती प्रभात कथुरिया आणि मुलगी रुबी यांनी केला आहे.

























































