IPL 2023 जो जिंकणार तोच वाचणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या प्ले ऑफची लढाई आता आणखी तीव्र झाली आहे. शनिवारी होणारे दोन्ही सामने चार संघांचे भवितव्य ठरवणार आहे. आता जरतर चा पर्याय संपला असून जो जिंकणार तोच वाचणार. मग तो हैदराबाद -लखनौचा सामना असो किंवा दिल्ली-पंजाबचा. जो संघ जिंकणार तोच वाचणार. त्याचेच प्ले ऑफचे आव्हान कायम राहणार. दिल्ली आणि पंजाब या सामन्यात दोन्ही संघांना आता विजयाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. दोन्ही संघांचे नेट रनरेट अगदी मायनसमध्ये असल्यामुळे जो जिंकेल त्याच संघाच्या प्ले ऑफच्या अंधुक आशा कायम राहणार आहेत. त्यामुळे उद्या धवन आणि वॉर्नर विजयासाठी सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरतील. गेल्या सामन्यात दोन्ही संघ हरले होते. त्यामुळे दोन्ही संघांत फार मोठे बदल अपेक्षित आहेत. त्यातच दोन्ही संघांना केवळ विजय मिळवूनही चालणार नाही. मोठे विजय नोंदविले तर ते नेट रनरेटच्या शर्यतीत टिकू शकतील.