बाळाच्या स्तनपानाबद्दल लाजायचं कशाला ? अभिनेत्रीचा ट्रोलर्सना सवाल

अभिनेत्री एव्हलीन शर्मा हिने तिच्या 2 महिन्यांच्या बाळाला स्तनपान करत असतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. महिनाभरापूर्वी देखील तिने तिची मुलगी एव्हा हिला स्तनपान करत असतानाचा फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

या दोन्ही फोटोंबद्दल तिचं काहींनी कौतुक केलं होतं, तर बऱ्याच जणांनी टीका केली होती. तुझे खासगी क्षण तुझ्यापुरताच मर्यादीत ठेव, ते सोशल मीडियावर कशाला शेअर करतेस असा प्रश्न ट्रोलर्सने तिला विचारला होता. याला उत्तर देताना एव्हलीनने या ट्रोलर्सना प्रश्न विचारला आहे की बाळाच्या स्तनपानाबद्दल लाजायचं कशाला ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

एव्हलीनने हे फोटो शेअर करण्यामागची तिची भूमिका मांडताना म्हटलंय की ‘आई झाल्यानंतरचा माझा प्रवास कसा होता हे माझ्या मित्रमंडळींना आणि चाहत्यांना कळावं यासाठी माझा हा सगळा खटाटोप आहे.’ स्तनपान ही नैसर्गिक आणि आरोग्यदायी गोष्ट असल्याचं सांगताना एव्हलीनने म्हटलंय की महिलांना जर स्तन असतील तर त्याबद्दल लाजायचं कशाला ?

 

View this post on Instagram

 

A post shared by Evelyn Sharma (@evelyn_sharma)

स्तनपान ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी गोष्ट असून ती लोकांना वाटते त्यापेक्षा बरीच कठीण असल्याचं एव्हलीनचं म्हणणं आहे. मी माझ्या बाळाचे स्तनपानाचे फोटो शेअर करून त्या सगळ्या मातांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की त्या एकट्या नाहीत असंही तिचं म्हणणं आहे.