ऑपरेशन करताना डॉक्टर नेहमी हिरव्या रंगाचे कपडे का करतात परिधान? ‘हे’ आहे कारण…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑपरेशन करताना डॉक्टर नेहमी हिरव्या रंगाचे कपडे परिधान का करतात? असा प्रश्न अनेकांना पडला असले. आज आपण याच प्रश्नच उत्तर जाणून घेणार आहोत.

शस्त्रक्रिया सहसा लवकर समाप्त होत नाहीत त्याला एक निर्धारित वेळ लागतो. शस्त्रक्रिया करताना वैद्यांना नेहमी अलर्ट मोडवर राहुल जटिल समस्या सोडवाव्या लागतात. अशातच साहजिक पणे वैद्यांचं स्वत:च्या मानसिक स्थितीवर नियंत्रण असणं, फारच गरजेचं असतं. तरच ती शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते आणि वैद्यांना यासाठी मदत करतो हिरवा रंग.

मानसशास्त्रानुसार आपण कोणत्याही रंगाला एकटक खुपवेळ पाहु शकत नाही. जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर काही वेळातच आपल्याला अस्वस्थपणा जाणवू लागेल. मात्र या नियमाचं उल्लंघन हिरवा रंग करतो. हिरव्या रंगाला कितीही वेळ एकटक पाहिल्याने आपल्याला अस्वस्थपणा जाणवणार नाही, असं मानसशास्त्राचं मत आहे.

प्रत्येक रंगाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, तसंच या हिरव्या रंगाचं सुद्धा आहे (उदा – निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर त्याचा हिरव्या रंगाला पाहून आपल्याला शांतता मिळते.)

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सर्वेश सोनवणे यांनी ही माहिती दिली.