उन्हाळ्यात मक्याचे कणीस का खावे? वाचा सविस्तर…

स्वीट कॉर्न म्हणजे मक्याची कणसं उन्हाळ्यात सेवन करण्याचे बरेच फायदे आहेत. सूप, स्नॅक्स, टॉपिंग आणि कॉर्न फ्लॉवर म्हणजे मक्याचे पीठ असे विविध स्वरुपात मक्याचे पदार्थ खाल्ले जातात.

स्वीट कॉर्नमध्ये मिनरल, अँण्टीऑक्सीडंट आणि जीवनसत्त्व ए, बी, ई, अ, बी6, बी12 आणि थायमिन यासारखे पौष्टिक घटक आहेत. जे उत्तम आरोग्याकरिता आवश्यक तर आहेतच शिवाय बऱ्याच शारीरिक समस्या दूर करण्यासाठीही मक्याचा दैनंदिन आहारात समावेश करू शकता.

मक्यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रियेला मदत होते. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात.

मक्याच्या गोड दाण्यात अँण्टीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्व असते यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. मका खाल्ल्याने दृष्टी सुधारते.

यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहायला मदत होते. शरीरात नव्या पेशींची निर्मिती होते. मधुमेहाचा त्रास दूर होतो. मक्यामध्ये फेनोलिक फ्लेवोनोइड अँण्टीऑक्सिडंट असते. यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

बेटा केरोटीनचे प्रमाण मक्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. यातील अँण्टीऑक्सिडंटमुळे बरेचसे शारीरिक आजार दूर होतात. तसेच जीवनसत्त्व बी 12 आणि आयर्न भरपूर प्रमाणात असल्याने लाल रक्तपेशी तयार व्हायला मदत होते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.

मक्याच्या कणसातील कार्बोहायड्रेट आणि कॅलरीजही जास्त प्रमाणात असते. यामुळे मेंदूला उर्जा मिळते. उत्साही राहायला मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या