फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शन का नाही? सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

supreme court

मृत्युदंडाच्या शिक्षेत फाशीऐवजी प्राणघातक इंजेक्शन का दिले जात नाही, असा सवाल आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला. फाशीच्या शिक्षेची प्रक्रिया दीर्घकाळ चालते.

मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी फाशीऐवजी इतर पर्यायांचा वापर करण्यास सरकारने विरोधी भूमिका घेतली होती. तर फाशीची शिक्षा क्रूर, दीर्घकाळ चालणारी आणि वेदनादायक असते. याउलट इंजेक्शनसारख्या पर्यायांमुळे शिक्षेची प्रक्रिया वेगाने होते, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालनाने सरकारची कानउघडणी करताना सरकार काळानुरूप बदल स्वीकारून इंजेक्शन किंवा इतर आधुनिक उपाय का वापरत नाही, असा सवाल केला.