
आपल्यापैकी अनेक कुटूंबांमध्ये कांद्याशिवाय एखादा पदार्थ करायचा म्हटला की, विचार येतो आता नेमकं करायचं तरी काय.. हिंदुस्थानातील स्वयंपाक घरांमध्ये कांद्याशिवाय स्वयंपाक अपूर्णच मानला जातो. अर्थात याला काही स्वयंपाकघर अपवाद आहेत. कांद्याचे आपल्या आहारातील महत्त्व हे खूप अबाधित आहे. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कांदा केवळ चव वाढवत नाही तर पोषक तत्वांनीही समृद्ध असतो. दुपारच्या जेवणात कच्चा कांदा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
कांदा खाण्याचे फायदे?
कच्च्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळते.
कांद्यामध्ये सल्फर आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेसाठी फायदेशीर असते. त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत होते तसेच मुरुम येण्यापासून रोखते. उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि प्रदूषणामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. पण कच्चा कांदा खाल्ल्यामुळे त्वचा निरोगी राहते.
प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात एक वाटी हा पदार्थ असायलाच हवा, वाचा
कच्चा कांदा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यात क्रोमियमसह इतर घटक असतात, जे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते, कारण ते इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते. तुमच्या आहारात कच्चा कांदा न विसरता खाण्यास सुरुवात करा.
गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या अनेकदा उद्भवू शकतात. कच्चा कांदा पचनक्रिया सुधारतो. त्यात भरपूर प्रमाणात आहारातील फायबर असते. त्यामुळे आपले पोट स्वच्छ होते. कांदा खाण्यामुळे आपली पचनसंस्था मजबूत होते.




























































