बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी वरदान का मानले जाते, वाचा सविस्तर

निरोगी राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करणे हे खूप गरजेचे आहे. उन्हाळा सुरु होताच आपल्याला बाजारात बेलफळ दिसू लागते. आपल्या आरोग्यासाठी हे बेल फळ फार उपयुक्त मानले जाते. उन्हाळ्याच्या हंगामात अनेक फळे आपल्याला बाजारामध्ये दिसतात. ही फळे आपली पचनसंस्था सुधारतात आणि शरीराला थंडावा देतात. असेच एक फळ म्हणजे बेलफळ.

हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी महिलांनी आहारात हे पदार्थ समाविष्ट करावेत, वाचा

बेलाचे आरोग्यवर्धक फायदे

बेलाचे हे फळ बाहेर कडक आवरणाचे असले तरी त्याचे फायदे हे खूप असतात. खासकरून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेलाचा रस पिणे हे निरोगी मानले जाते.

बेलाचा प्रभाव हा थंड असल्यामुळे, याला उन्हाळ्यातील सुपरफ्रूट म्हटले जाते.

बेलामध्ये जीवनसत्त्वे अ, क, बी६ तसेच मुबलक फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, टॅनिन, कॅरोटीन, थायामिन, बीटा-कॅरोटीन अशी तत्वे असतात.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी… हे करून पहा

बेलफळ खाणे हे पचनसंस्थेसाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. बेलफळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने अपचन, छातीत जळजळ, पोटफुगी, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्या दूर होतात.

बेलफळ खाल्ल्यामुळे उन्हाळ्यात आपल्या पोटात होणारी जळजळ थांबते. यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात अतिसार ही एक सामान्य समस्या आहे आणि बेलफळाचा रस सेवन करण्यामुळे आपल्याला आराम मिळतो.

बेलफळात लोहाचे प्रमाण हे मुबलक असते. अशक्तपणाचा त्रास होत असल्यास, बेलफळ हे फार गरजेचे मानले जाते.

बेलफळामध्ये कॅल्शियम देखील खूप असते. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच हाडांच्या समस्या टाळण्यासाठी, बेलफळ खाणे हे केव्हाही हितावह मानले जाते.

बेलफळ हे यकृताच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम मानले जाते. मळमळ किंवा उलट्या होत असल्यास, बेलफळ खाणे हे फार गरजेचे मानले गेले आहे.

उन्हाळ्यात बेलफळ खाणे हे खूप गरजेचे मानले जाते. बेलफळाच्या सेवनामुळे पोटातील उष्णता कमी होते.

वजन कमी करण्यासाठी सुद्धा बेलफळ हे खूप गरजेचे मानले जाते.