
घरातील टय़ुबलाईटचा प्रकाश काही महिन्यांनंतर कमी होतो. ट्युबलाईट जुनी झाल्यावर किंवा तिच्या आतील फॉस्फरस कोटिंग खराब झाल्यावर टय़ुबलाईटचा प्रकाश कमी होतो. चोक खराब झाल्याससुद्धा टय़ुबलाईटला पुरेसा विद्युतप्रवाह मिळत नाही. असे सर्वात आधी टय़ुब काळसर झाली की नाही हे तपासून घ्या.
n जर तो भाग खराब झाला असेल तर टय़ुबलाईट बदला. जर टय़ुबलाईट नवीन असूनही पुरेसा प्रकाश पडत नसेल तर इलेक्ट्रिशियनला दाखवा. त्याचा चोक तपासून घ्या. शक्य असेल तर तो बदला. योग्य निदान आणि दुरुस्तीसाठी एखाद्या अनुभवी इलेक्ट्रिशियनची मदत घ्या.