घटस्फोटाला नकार दिल्याने पत्नीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

घटस्फोट आणि मुलाचा ताबा देण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. रूपाली ऊर्फ जारा इकबाल शेख असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी इकबाल शेखला अटक केली.

रूपाली ही चेंबूर परिसरात राहत होती. त्याच परिसरात इकबाल राहत होता. इकबालला पहिल्या पत्नीपासून मूल होत नसल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी इकबालची ओळख रूपालीशी झाली. त्याने रूपालीसोबत प्रेमविवाह केला. मूल झाल्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाले. तसेस इकबालला त्याचे कुटुंबीय हे रूपालीला घटस्पह्ट देण्यास सांगत होते. तसेच मुलाचा ताबा देण्याची त्यांच्याकडून मागणी होत होती. मात्र रूपालीने त्यास नकार दिल्याने इकबालने रूपालीला चेंबूरच्या नागेवाडी येथे भेटण्यास बोलावत चाकूने वार केले.