घरगुती वादातून पत्नीने पतीच्या डोक्यात मारली हातोडी, पतीचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर मध्ये एका पत्नीने घरगुती वादातून आपल्या पतीच्या डोक्यात हातोडी मारली आहे. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पत्नी संगीताला अटक केली आहे.

संजय घेवदे हे वारणा साखर कारखान्याचे कर्मचारी व वारणा कामगार सोसायटीचे संचालक आहेत. रविवारी रात्री संजय व पत्नी संगीता यांच्यात घरगुती कारणातून झालेला वाद टोकाला गेला. यावेळी पत्नी संगिताने घरातील लोखंडी हातोडा पती संजय यांच्या डोक्यात घातला.हा घाव वर्मी बसल्याने,पती संजय यांचा जागीच मृत्यू झाला. या दाम्पत्याला एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.