पीक विमा न मिळाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने मिळवून देईल – उद्धव ठाकरे

5

सामना ऑनलाईन । जालना 

पीक विमा कंपनीची मुख्यालय मुंबईत, शेतकर्‍यांना फायदा न मिळाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने मिळवून देईल, असे खणखणीत आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. जालन्यात दुष्काळ दौर्‍यावर असताना शेतकर्‍यांशी संवाद साधत त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच गावागावात दुष्काळ निवारणासाठी मदत केंद्र उभारण्याचे आदेशही त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “शेतकर्‍यांना मिळणार्‍या पीकविम्याची माहिती द्या. ज्या शेतकर्‍यांना पीक विमा मिळाला नाही अशाची माहिती गोळा करा. पीक विम्यात घोळ झाला असेल तर तो मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. पीक विमा कंपन्यांचे ऑफिसेस मुंबईतच आहेत. पीक विमा जर मिळाला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने तो मिळवून देईल.”  तसेच महाराष्ट्राच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्याकडे आपण हक्काने मदत मागू शकतो’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेनेच पहिली शेतकरी कर्जमाफी केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आधीच्या सरकारने फक्त प्रकल्पांची स्वप्ने दाखवली, आमचे सरकार हे स्वप्न पूर्ण करणार असा विश्वास त्यांनी व्यक्ता केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करू असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.