युद्धजन्य परिस्थितीत 90 दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा आवश्यक! देशात किती तेल साठा शिल्लक? जाणून घ्या सविस्तर माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
india oil reserves iran war escalation strait of hormuz closed impact

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले असून, संभाव्य ऊर्जा संकट लक्षात घेता हिंदुस्थान आपल्या तेल साठ्याची गणिते मांडत आहे. शनिवारी इराणवर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर, ज्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला, इराणच्या सरकारी माध्यमांनी ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) बंद केल्याची घोषणा केली आहे. जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याचा पाचवा हिस्सा याच मार्गावरून जातो.

प्रमुख जागतिक शिपिंग कंपन्यांनी या जलमार्गातून वाहतूक थांबवली आहे आणि रविवारी ओमानजवळ एका तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला देखील झाला आहे. असे असूनही, हा मार्ग बंद झाल्यामुळे हिंदुस्थानच्या तेल पुरवठ्यात तातडीने कोणताही मोठा अडथळा येण्याची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

७४ दिवसांचा बॅकअप

फेब्रुवारीच्या सुरुवातीला पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत सांगितले होते की, जागतिक पातळीवर कोणतीही खळबळ उडाली तरी हिंदुस्थानचा ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ (मोक्याचा तेल साठा) ७४ दिवस पुरेल इतका आहे. ‘आम्ही आमच्या तेल साठ्याची गणना केवळ जमिनीखालील साठवणींच्या जागांमध्ये (caverns) साठवलेल्या तेलावरून करत नाही, तर आमच्या रिफायनरीजमधील साठ्याचाही त्यात समावेश असतो’, असे पुरी यांनी स्पष्ट केले होते.

ते पुढे म्हणाले, ‘आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आमचे जमिनीखालील साठे आहेत आणि ओडिशामध्येही लवकरच काम सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे. जर तुम्ही आमच्या गुहांमधील साठा, रिफायनरीजमधील साठा, बंदरांवरील फ्लोटिंग प्लॅटफॉर्म आणि पेट्रोलियम उत्पादने एकत्र पाहिली तर हा साठा ७४ दिवसांचा होतो. आदर्शस्थितीनुसार खरं तो ९० दिवसांचा असायला हवा, पण ७४ दिवसांचा साठाही सुरक्षित मानला जाऊ शकतो. भविष्यात आम्ही हा साठा वाढवण्याचा विचार करू शकतो’.

देशातील ‘स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह’ सुविधा सुमारे ९.५ दिवस पुरू शकतात. याव्यतिरिक्त, तेल विपणन कंपन्यांकडे (OMCs) उपलब्ध असलेल्या कच्च्या तेलाची आणि पेट्रोलियम उत्पादनांची साठवण क्षमता अंदाजे ६७ दिवसांचा साठा देऊ शकते.

रशियाकडून तेल आयात वाढवण्याची गरज

तेल अर्थतज्ज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट पारीख यांनी एका मुलाखतीत सांगितले की, जर हे युद्ध दीर्घकाळ चालले तर ‘वाढत्या किमतींचा दबाव कमी करण्यासाठी हिंदुस्थानने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात वाढवली पाहिजे’.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १ डॉलरची वाढ झाली, तर भारताच्या तेल आयात खर्चात १.४ अब्ज डॉलरची भर पडू शकते. गॅसच्या किमतीही वाढतील कारण भारत आपल्या गरजेच्या ५०% गॅस परदेशातून आयात करतो. ‘मध्यपूर्वेतील युद्ध अमेरिकेने सुरू केले आहे, त्यामुळे वाढत्या किमतींचा सामना करण्यासाठी आम्हाला रशियाकडून अधिक तेल आयात करणे भाग पडले आहे, असा युक्तिवाद भारत अमेरिकेसमोर करू शकतो’, असेही पारीख यांनी नमूद केले.

india oil reserves iran war escalation strait of hormuz closed impact

with iran closing the strait of hormuz, india calculates its strategic oil reserves. petroleum minister hardeep puri says india has 74 days of oil stock. check latest energy news on saamana.

Keywords: saamana, samana, samna, daily saamana, सामना, strategic petroleum reserve india, hardeep singh puri, oil prices iran war, strait of hormuz closed news, russia india oil trade.