
हिवाळा केवळ सांधेदुखी किंवा श्वसनाच्या समस्यांचा नाही, तर मूत्राशयाच्या समस्याही वाढवणारा आहे. थंडीच्या काळात लघवीच्या समस्या तीव्र होतात. तापलेल्या जागेतून थंड वातावरणात पांमण करताना अचानक लघवी करण्याची गरज कशामुळे वाटते? मद्यपान केल्यानंतर लघवीवरील नियंत्रण कमी होते वा लघवीचे प्रमाण वाढल्यासारखे का दिसते? स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या अधिक आढळते का? या काही शंका आहेत, ज्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
थंडीच्या दिवसांत लघवीच्या समस्या वाढण्यामागील कारणे
हिवाळ्यात, विशेषत वर्षाच्या सुरुवातीला लघवीच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होते. जर तुम्हाला मूत्राशयाच्या समस्या असतील तर ते नियंत्रणात ठेवणे आव्हानात्मक असू शकते. थंड हवामानामुळे वारंवार लघवीला जाण्याचे प्रमाण वाढते. कारण कमी घाम येत असल्यामुळे द्रव कमी होतो. ज्यामुळे वारंवार लघवी करण्याची गरज भासते. हे समस्याप्रधान नसले तरी अतिािढयाशील मूत्राशय असलेल्या लोकांची दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते. अशांनी तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. तथापि मूत्राशयाच्या समस्यांसाठी थंड हवामान हे एकमेव कारण नसून अति वा प्रमाणात मद्यपान केल्यानेही या समस्या वाढू शकतात. अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कॅफिनयुक्त पेये यांचे अतिसेवन मूत्राशयाला त्रास देऊ शकते. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे आणि जास्त प्रमाणात द्रवपदार्थ सेवन केल्यामुळे थंड हवामानात मूत्राशयाच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येते. यासाठी मुख्य कारणीभूत गोष्टींबाबत आपण सतर्क राहिले पाहिजे.
लघवीची समस्या आणि याबाबतची अनास्था
पुरुष किंवा स्त्रिया, दोन्हीमध्ये लघवीची लक्षणे दिसण्याचे प्रमाण जवळपास समान आहे. तरीही स्त्रिया वैद्यकीय मदत लवकर घेण्याबाबत पुढे दिसून येतात. पुरुष स्वतमधील या बदलांकडे दुर्लक्ष करतात. याबाबत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अनेकदा याबाबतीतील काही समस्या भविष्यात गंभीर स्वरूप घेऊ शकतात. जर पुरुषांना लघवी करण्याची तीव्र इच्छा, लघवी करण्यात अडचण किंवा मूत्राशय पूर्णपणे रिकामे झाले नसल्याची भावना यापैकी कोणतेही लक्षण दिसत असेल याबाबत त्वरीत काळजी घ्यायला हवी. कारण या लक्षणांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाची शक्यता दिसून येते.
उपचार आणि उपाय यात समन्वय राखा
डॉक्टर लक्षणांच्या आधारे उपचार पद्धती ठरवतील. परंतु या समस्येबाबत स्वतच काही नियम पाळले तर काही अंशी आराम मिळू शकतो. या आजारांनी भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू नये याकरता हिवाळ्यात मूत्राशयाचे आरोग्य म्हणजे हायड्रेशन आणि ािढयाकलाप यांच्यात संतुलन राखणे आवश्यक आहे. यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे ज्याने रक्ताभिसरण वाढते आणि मूत्राशयाचे कार्य निरोगी राहण्यास मदत होते.
जीवनशैली आणि आहारातील बदल
कॅफिनयुक्त शीतपेयांचे अतिसेवन टाळा कारण ते तुमच्या शरीराचे निर्जलीकरण करू शकतात. तसेच यामुळे वारंवार लघवी होऊ शकते.यासाठी चांगले हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर नियमित अंतराने द्रवपदार्थ घ्या. थंडीच्या महिन्यात तुमचे मूत्राशय कसे वागते यावर जीवनशैलीचा प्रभाव असू शकतो. जेवणामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, जे तुमच्या आतडय़ांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. मूत्राशयावरील ताण कमी करण्यासाठी आणि अस्वस्थतेच्या संवेदना कमी करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. अल्कोहोलपासून दूर रहा आणि लघवीची लक्षणे योग्य नसल्याचे लक्षात येताच त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
डॉ. छाया वाजा, अंतर्गत औषध तज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा, मुंबई




























































