यंदाची थंडी उन्हाळय़ासारखीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पुण्यात आज २० अंश सेल्सियस तापमानाची झाली नोंद.

अभूतपूर्व पाऊस झाल्याने थंडीही कडाक्याची पडणार असा विचार सोडून द्या. येत्या डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान पडणाऱ्या हिवाळ्यात एरव्हीपेक्षा वातावरण थोडे गरमच राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अगदी उत्तरेचा भाग वगळता देशातील उर्वरित भागांमध्ये थंडीचा कडाका तितकासा नसेल. जागतिक तापमान वाढल्याने म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडीच्या तीव्रतेवर परिणाम होणार आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.