हिवाळी अधिवेशन- अंबादास दानवे यांचा ट्विट बाॅम्ब, शिंदे गटाच्या आमदाराचा नोटांच्या गड्ड्यांसह व्हिडीओ पोस्ट, अधिवेशन तापणार

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. एक्सवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करताहेत? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट विचारला आहे. केवळ इतकेच नाही तर, या व्हिडीओमध्ये कोण आमदार आहे असा प्रश्नही विचारल्यामुळे आता हिवाळी अधिवेशन चांगलेच तापणार हे दिसून येत आहे.

एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत अंबादास दानवे यांनी म्हटले की, या सरकारकडे फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! पैशांच्या गड्ड्यांसह हे आमदार काय करताहेत या प्रश्नांचं उत्तर जनतेला द्यायलाच हवं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना थेट सवाल विचारला आहे.