ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने नको त्या पद्धतीने केला स्पर्श, व्हिडीओ व्हायरल होताच कंपनीने केली कारवाई

दिल्लीत एका महिलेने ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयने नको त्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडीओही तिने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सगळीकडून संतापाचे वातवरण पसरले आहे.त्यासोबत महिलेने कंपनीवर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. ज्यानंतर ब्लिंकिटने कारवाई करत आरोपीचे कंट्राट रद्द केले.

हा व्हिडीओ शेअर करताना महिलेने लिहीले की, आज ब्लिंकिट ऑर्डर केल्यानंतर माझ्यासोबत असे घडले. त्या डिलिव्हरी बॉयने माझा पत्ता पुन्हा विचारण्याच्या बहाण्याने नको त्या पद्धतीने स्पर्श केला. हे अजिबात मान्य नाही. देशात महिलांची सुरक्षा गंमत आहे का? असा संतप्त सवालही केला आहे, त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला .

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत ब्लिंकीटचा डिलिव्हरी एजंट पिवळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये पार्सल देत आहे आणि पैसै घेत आहे. जसा तो त्या महिलेला उरलेले पैसे देतो. त्यानंतर तो पुढे येऊन महिलेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

महिलेने अन्य पोस्ट मध्ये लिहीले की, सुरुवातीला कंपनीने तिची तक्रार गंभीरतेने घेतली नाही. आधी ब्लिंकीट केवळ त्या एजंटला इशारा देत महिला ग्राहकांशी दूर राहण्यास सांगत होते. पण ज्यावेळी महिलेने व्हिडीओ दाखवला त्यावेळी मात्र ब्लिंकिटने त्या डिलिव्हरी बॉयचे कंटात्र रद्द केले. महिलेने सांगितले की, तिने एफआयआर दाखल केला नाही कारण त्याने आणखी मानसिक त्रास होईल. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ब्लिंकीट कंपनीने प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला फार खेद आहे की, तुम्हाला वाईट अनुभव आला. आम्ही तुमचे प्रकरण गांभीर्याने घेत त्या डिलिव्हरी बॉयवर कारवाई करत त्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहे.