
विलेपार्ले परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेला जुहू पोलिसांनी अटक करून पाच तरुणींची सुटका केली. आशा मंडल असे अटक महिलेचे नाव असून तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
विलेपार्लेच्या नेहरूनगर परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती जुहू पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर, रक्षे, मिरांगे, नलावडे, खोमाने, जगताप, जाधव यांच्या पथकाने नेहरूनगरच्या हनुमान गल्लीत छापा टाकला. एका घरात सहाजणी पोलिसांना दिसून आल्या. पोलिसांनी कारवाई करून पाच तरुणींची सुटका केली. तरुणींची वैद्यकीय तपासणी करून त्याची रवानगी महिला सुधारगृहात केली. तर सेक्स रॅकेट चालवणाऱया आशा मंडलविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली.

























































