
अॅण्टॉप हिलच्या प्रतीक्षा नगरात एक संतापजनक प्रकार घडला. विवाहिता गळफास लावून आत्महत्या करीत असतानाही तिचा नातेवाईक तरुण ते बघत बसला. त्याने तिला अडविण्याचा प्रयत्नच न केल्याने त्या विवाहितेचा गळफास लावून घेतल्याने जीव गेला. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांनी आत्महत्येचा थरार बघत बसणाऱ्या तरुणाला बेडय़ा ठोकल्या आहेत.
सारस्वत यादव (28) असे त्या तरुणाचे नाव आहे, तर सुनिता यादव (44) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. सारस्वत हा सुनिताचा आत्येदीर लागत होता. सुनिता आणि सारस्वत यांचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मला सोडून दुसऱ्या मुलीशी विवाह करून नको, असे सुनिताचे म्हणणे होते. परंतु सारस्वत याने पुढच्या वर्षी एका मुलीशी विवाह करायचे ठरवले होते. त्यातूनच त्यांच्यात वाद होत होता. शनिवारी दुपारी सुनिताने आत्महत्या करीत असल्याचे सारस्वतला धमकावले. पण त्यावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर सुनिताने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून घेतला.






























































