वडजी येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

औसा शहरासह तालुक्यात अनेक भागात सोसाट्याचा वारा, वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचे सत्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून तालुक्यात सुरू आहे. दरम्यान वडजी तालुक्यातील औसा येथे एका महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली तानाजी मुळे (35) असे या मृत महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता वैशाली शेतात मशागतीचे काम करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक वीजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटल्याने वैशाली शेतातील झाडाखाली जाऊन बसली. यावेळी अचानक तिच्या अंगावर वीज पडल्याने वैशालीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.