
डॉक्टरच्या अनुपस्थितीत नर्सने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना गोवंडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी नर्स नफिसा शेख (30) हिला अटक केली आहे. गोवंडीच्या शिवाजीनगर येथील मन्नत हॉस्पिटलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. मृत महिला शबाना यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्या दवाखान्यात उपचारासाठी गेल्या होत्या. तेव्हा डॉक्टर नसताना नफिसा हिने शबाना यांना चुकीचे इंजेक्शन दिले. त्या इंजेक्शनचा विपरीत परिणाम झाला आणि त्यात शबाना यांचा जीव गेला. हा प्रकार कळताच शिवाजीनगर पोलिसांनी कलम 304 (2), 34 भादंविअन्वये गुन्हा दाखल करून नफिसा हिला अटक केली.























































