महिलेला घरात सापडली गुप्त तिजोरी, तिजोरी उघडल्यावर आत जे दिसलं….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका महिलेला आपल्या घरात एक गुप्त तिजोरी सापडली आहे. तिला ही तिजोरी पाहून धक्का बसला असून तिने ही तिजोरी उघडून देखील पाहिली. आपला हा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला.

या महिलेचं नाव लिझ असं आहे. तिने नोव्हेंबर महिन्यात नवीन घर घेतलं होतं. घरात प्रचंड अस्वच्छता असल्याने तिने सफाई सुरू केली. त्यात तिला जमिनीवरील कारपेटच्या खाली काहीतरी वेगळं असल्याचं जाणवलं.

तिने कारपेट बाजुला करून पाहिलं तर त्याच्या खाली एक गुप्त तिजोरी होती. ती अंदाजे 70च्या दशकात बनवली गेली असावी, असा लिझचा अंदाज आहे. ती तिजोरी अंकांच्या विशिष्ट संयोजनानेच उघडते. त्याला इलेक्ट्रॉनिक कुलूप म्हणतात. असं कुलूप उघडण्यासाठी तज्ज्ञाची गरज भासते.

लिझन जिम नावाच्या एका तज्ज्ञाला बोलवलं. त्याने मोठ्या सफाईदारपणे हे कुलूप तोडलं. महिलेने ती तिजोरी उघडून पाहिली. तेव्हा तिची निराशा झाली. कारण, आत काहीही नव्हतं. पण, जिम या तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार ही तिजोरी आता तिची आहे. तिला हवं असल्यास नवीन अंक वापरून ती नवीन कुलूप बसवू शकते आणि तिजोरीचा वापरही करू शकते.