पोहायला गेलेली महिला हरवली, 20 दिवसांनी गटारात विवस्त्र सापडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोहायला गेलेली एक महिला बेपत्ता झाली आणि काही दिवसांनी गटारात सापडल्याची घटना घडली आहे. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरात घडली आहे. येथे राहणारी लिंडसे कॅनेडी नावाची 43 वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लिंडसे ही 3 मार्च रोजी शहरातील एका कालव्यात पोहायला गेली होती. या शहरातले कालवे एकमेकांना बोगद्याने जोडलेले आहेत.

अशाच एका बोगद्याचं दार लिंडसेला पोहताना दिसलं. त्यात तिने पोहायला सुरुवात केली. पण, काही वेळ पोहल्यानंतर तिला लक्षात आलं की तिला बाहेर येण्याचा रस्ता सापडेनासा झाला आहे. त्यामुळे तिने बाहेर पडायचा मार्ग शोधायला सुरुवात केली.

कितीही प्रयत्न केले तरी तिला तो मार्ग सापडेना. तब्बल 20 दिवस ती शहराच्या खाली असणाऱ्या बोगद्यांमध्ये फिरत राहिली. 23 मार्च रोजी तिला अचानक एका ठिकाणी उजेड दिसला. ती उजेडाच्या दिशेने गेली. त्या गटाराची उंची जास्त असल्याने तिने हाका मारायला सुरुवात केली.

तिथून जाणाऱ्या लोकांचं लक्ष त्या हाकांनी वेधलं गेलं. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिला बाहेर काढलं. ती विवस्त्र अवस्थेत होती. 20 दिवस अन्नपाण्यावाचून अशक्त झाली होती. तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

लिंडसेच्या आईने दिलेल्या जबाबानुसार, 3 मार्च रोजीच ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिने नोंदवली होती. लिंडसे एका मानसिक रोगाने त्रस्त असून तिला अंमली पदार्थांचं व्यसन असल्याचंही या माहितीत उघड झालं आहे.

लिंडसे नक्की स्वतःहून पोहायला गेली किंवा तिला कुणी जबरदस्तीने पाण्यात टाकलं हे अद्याप सिद्ध झालेलं नाही. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.