लग्नाच्या अमिषाने विवाहीत महिलेवर बलात्कार, 15 लाख रुपयांना गंडवले

प्रातिनिधिक फोटो

लग्नाच्या अमिषाने महिलेवर वारंवार बलात्कार केला. त्यात ती गरोदर राहिल्यानंतर धमकावून तिचा गर्भपात केला. इतकेच नव्हे, तर तिने उधार दिलेले 15 लाख रुपये देण्यास नकार देऊन आरोपीने तिला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट 2011 ते 4 नोव्हेंबर 2019 दरम्यान ही घटना घडली.

एका 29 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहिदास नथू खाटपे (रा. गणेश मार्केट, गंगाधाम रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विलास मडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे लग्न झाले असून, तिला दोन मुले आहेत. आरोपी रोहिदासदेखील विवाहित असून त्याची पुणे मार्केट यार्डमध्ये चहाची टपरी होती. आता त्याच ठिकाणी त्याचे कॅन्टीन आहे. संबंधित पीडित महिला पहाटे भाजीपाला आणायला जात असे.

त्यावेळी त्या महिलेची व रोहिदासची ओळख झाली होती. पुढे त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने धमकी देऊन, तसेच तुला सांभाळतो, तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून तिच्यावर थेरगाव, तसेच कात्रज येथील हॉटेलवर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिल्यावर तीन वेळा पीडित महिलेचा गर्भपात केला. दरम्यानच्या काळात या विवाहित महिलेने आरोपीला 15 लाख रुपये हातउसने दिले. ते मागितले असता आरोपीने शिवीगाळ करून तिला मारहाण केली.

आपली प्रतिक्रिया द्या