लाच घेणाऱ्या महिला तलाठीला रंगेहाथ पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

शेतजमिनीचा फेर करुन देण्याच्या कामासाठी १३०० रुपयाची लाच स्विकारणाऱ्या महीला तलाठीला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लातूर तालुक्यातील शिऊर येथील तलाठी सज्जाच्या तलाठी रेणुका शिवाजी पुरी यांनी तक्रारदाराच्या वडीलांच्या नावे शिऊर शिवारातील गट नं.११७/१ मधील खरेदी केलेल्या शेतजमिनीचा फेर करुन देण्याच्या कामासाठी १५०० रुपयाची लाच मागितली होती. तडजोडीअंती १३०० रुपये लाच स्विकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.