महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, रुग्णालयात नेत असताना अँम्ब्युलन्सचा भीषण अपघात झाला

death

केरळमधील आलापुझ्झामध्ये एक विचित्र आणि दुर्दैवी घटना घडली आहे. इथे 5 वर्षांच्या मुलाच्या आईने जीव द्यायचा प्रयत्न केला. काकाच्या घरी असताना तिने स्वत:ला पेटवून घेतलं होतं. राखी असं या महिलेचं नाव आहे. थन्नीरमुक्कोम भागात हा प्रकार घडला होता.

राखी या दुर्घटनेत जबर भाजली होती, तिला इलाजासाठी रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. तिला अँम्ब्युलन्समधून दोन खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. यामुळे तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवण्यात आलं. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सरकारी रुग्णालयाकडे जात असताना अँम्ब्युलन्सने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात राखीचा मृत्यू झाला. राखीसोबत असणारे तिचे वडील आणि काका हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या