महिलेचा विनयभंग केला, अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। राहाता

साप दाखवण्याच्या बहाण्याने विवाहीत महिलेला शेतात बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकुरखे येथे एका सतरा वर्षीय मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विकास आग्रे असं त्याचे नाव आहे.

शनिवारी १४ जुलै रोजी पीडित महिला शेतात काम करत होती. त्याचवेळी शेजारी राहणारा विकास तेथे आला. त्याने शेतात मोठा साप आल्याचे सांगत महिलेस सोबत येण्यास सांगितले. विकासच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला त्याच्या पाठोपाठ शेतात गेली. पण साप कुठे दिसत नसल्याने तिने याबद्दल विकासला विचारले. त्याचवेळी विकास महिलेशी अंगलट करू लागला व आरडाओरड केल्यास विहीरीत फेकून देईन अशी धमकी त्याने दिली. हे बघताच महिलेने त्याच्या हाताचा करकचून चावा घेतला व तिथून पळ काढला. त्यानंतर तिने सगळा वृत्तांत पतीला व घरच्यांना सांगितला. याप्रकारामुळे महिला पुरती भयभीत झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी राहाता पोलिसांत तक्रार दाखल केली . पोलिसांनी या प्रकरणी विकास आग्रे याच्याविरूध्द भा दं वी कलम ३५४ (अ) ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.