
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ऑनलाईनच्या दुनियेमध्ये कधी, कोण आणि कशी फसवणूक करेल याचा भरवसा नाही. युएईमध्ये एका महिलेने लोकांची ऑनलाईन फसवणू केली आणि लाखो रुपये जमा केले. महिलेने सोशल मीडियावर लग्नानंतर आपली फसवणूक झाल्याचे सांगितले आणि दोन मुलांच्या भविष्यासाठी लोकांना मदतीचे आवाहन केले. लोकांनीही खातरजमा न करत महिलेच्या आवाहनानंतर तिच्या खात्यात तब्बल 50 हजार डॉलर (जवळपास 35 लाख रुपये) जमा केले. याचा सुगावा लागता दुबई पोलिसांनी याप्रकरणी लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
दुबई पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी महिला फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटवर मदतीचे आवाहन करत होती. याद्वारे तिने अनेक लोकांची फसवणूक केली आणि फक्त 17 दिवसात लाखो रुपये कमावले. मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकून मदत मागणाऱ्या महिलेच्या पतीबाबत चौकशी केली असता दोन्ही मुले त्याच्यासोबत राहात असल्याचे सिद्ध झाले. नातेवाईक आणि मित्रांचे फोन आल्यानंतर आपल्याला पत्नीचे काळे कृत्य कळाल्याचे पतीने सांगितले.



























































