
संपत्तीच्या वादातून कायम नातेवाईकांमध्ये वाद होत असतात. काहीवेळेला संपत्तीच्या वाद इतके टोकाला पोहोचतात की ते जीवावरही बेततात. अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना राजस्थानमधील आहे. आहे. संपत्तीच्या वादातून दोन जावांमध्ये जबरदस्त भांडण झाले. भांडण एवढे टोकाला गेले की भांडता भांडता त्या नाल्यात पडल्या आणि तरीही त्यांनी भांडण सुरुच ठेवले. सोशल मीडियावरचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थान येथील ब्यावर जवळील पेट्रोल पंपाजवळील आहे. इथे संपत्तीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये भांडण झाले. भांडण इतके वाढले की ते हातापाईवर आले. दोन्ही पक्षातील महिलांचे एकमेकींसोबत जबरदस्त भाडंण झाले. दोघी एकमेकींना मारता मारता पेट्रोल पंपाजवळील नाल्यात जाऊन पडल्या, तिथेही त्यांनी भांडण सुरुच ठेवले. त्यांचे भांडण पाहून लोकांची गर्दी जमा झाली. त्यांना थांबविण्यासाठी एक व्यक्ती नाल्यात उडी घेतो आणि त्यानंतर आणखी एकजण नाल्यात उडी घेतो आणि एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारतात.
अजमेर के करोड़पति घर की देवरानी-जेठानी में हुआ विवाद, लड़ते लड़ते नाले में गिरी pic.twitter.com/XQbT1XKrs0
— The Fact Factory. (@FactTheFactory) June 17, 2022
मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि दोन्ही पक्षाकडील लोकांना ताब्यात घेतले. दोन्ही पक्षांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सध्या पोलीस सीसीटिव्हीच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

























































