शिरूरच्या प्राथमिक रूग्णालयाचा निष्काळजीपणा; शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना एकत्र ठेवले

1121

बीड जिल्ह्यातील शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शनिवारी झालेल्या महिलांच्या कुटुंब शस्त्रक्रियामध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 17 ते18 महिलांना नातेवाईकांसह एका हॉलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती होती. रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त होत आहे.

शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शनिवारी 18 महिलांवर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेनंतर या 18 महिलांना थांबण्यात आलेल्या हॉलमध्ये धक्कादायक परिस्थिती होती. सोशल डिस्टन्स पाळताय येईल एवढी जागा नसल्याने महिला जागा मिळेल तिथे आराम करत होत्या. त्याच हॉलमध्ये या महिलांचे नातेवाईकही बसले होते. तसेच हॉलमध्ये उकाडा असह्य होत होता. शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठी जागा असताना एकाच हॉलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना का थांबविण्यात आले ,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या