IND Vs PAK – हिंदुस्थानने पाकिस्तानच्या चिंध्या उडवल्या, 61 चेंडूंमध्येच सामना जिंकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ICC T20 World Cup 2026 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान सामना सुरू झाला असून उभय संघांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. याच दरम्यान, Women’s Asia Cup Rising Stars 2026 Tournament मध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने पाकिस्तानच्या चिंध्या उडवल्याचे वृत्त समोर आले आहे. पाकिस्तानने दिलेले 93 धावांचे माफक आव्हान टीम इंडियाने 61 चेंडूंमध्येच पूर्ण केलं आणि 8 विकेटने सामना जिंकला आहे.

महिला आशिया चषक रायजिंक स्ट्रार्स स्पर्धेला 13 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून आज बँकॉक येथे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या 93 धावांवर बाद झाला. कर्णधार राधा यादव, प्रेमा रावत आणि सायमा ठाकोर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर मिन्नू मणी आणि जिंतीमणी कलिता यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत पाकिस्तानी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं.

पाकिस्तानने दिलेल्या या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात टीम इंडियाला सलामीवीर हुमैरा काझीच्या रुपात मोठा हादरा बसला. हुमैरा पहिल्याच चेंडूत भोपळ न फोडताच बाद झाली. मात्र, त्यानंतर वृंदा दिनेशने संघाची सुत्र आपल्या हाती घेत 29 चेंडूंमध्ये नाबाद 55 धावांची विजयी खेळी केली. तिने आपल्या डावात 12 चौकार मारले. वृंदाला मधल्या फळीत अनुष्का शर्मा (24) आणि तेजल हसबनीस नाबाद 12 धावा यांची चांगली साथ मिळाली आणि टीम इंडियाने 10.1 षटकांमध्ये सामना जिंकला.