वेलोसिटीचा धुव्वा, ट्रेलब्लेझर्सचा दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांच्या आयपीएलला गुरुवारपासून दणक्यात सुरुवात झाली. स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघाने मिताली राजच्या वेलोसिटी संघाचा 9 फलंदाज राखून धुव्वा उडवला आणि 2 गुण मिळवत फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. झुलन गोस्वामी, सोफी एकस्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा यांची प्रभावी गोलंदाजी व डिएंड्रा डॉटीन व रिचा घोष यांची दमदार फलंदाजी या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.

  • 7.5 षटकांमध्येच विजय – प्रथम फलंदाजी करणाऱया वेलोसिटी संघाचा डाव 15.1 षटकांतच 47 धावांमध्येच गडगडला. 48 या माफक धावसंख्येचा पाठलाग करणाऱया ट्रेलब्लेझर्स संघाने 7.5 षटकांत अवघा एक फलंदाज गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. कर्णधार स्मृती मंधाना 6 धावांवर बाद झाली. पण डिएंड्रा डॉटीन (नाबाद 29 धावा) व रिचा घोष (नाबाद 13 धावा) यांनी शानदार फलंदाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
  • डाव कोसळला – वेलोसिटीच्या फलंदाजांना पहिल्या लढतीत सूर गवसला नाही. ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागला नाही. त्यांचा डाव 15.1 षटकांमध्ये 47 धावांवरच कोसळला. फक्त तीन खेळाडूंना दुहेरी आकडी धावसंख्या करता आली. सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक 13 धावा केल्या.